शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – येथील विज महावितरण कंपनीवर बेधडक मोर्चा काढण्यात आला गोरगरीब सर्वसामान्य जनतेला लुबाडणाऱ्या आणि आपला मनमानी कारभार चालवणाऱ्या महाभकास आघाडी सरकारला दणका देण्यासाठी भाजपातर्फे वीज बिल विरोधात निषेध व हल्लाबोल आंदोलन महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचे पाप करणा-या वीज महावितरणाच्या निषेधार्थ शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी, 2021 रोजी महावितरण कंपनी वर भाजपा शहादा शहर चा वतीने महावितरण केंद्रा समोर जुना प्रकाशा रोड`शहादा येथे`निषेध व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जमदाडे,शहर अध्यक्ष विनोद जैन, महामंत्री ,हितेंद्र वर्मा, वैभव सोनार तालुका अध्यक्ष शशिकांतभाई पाटील, युवा अध्यक्ष, राजीव देसाई महिला उपाध्यक्ष कल्पनाताई पंड्या,महिला जिल्हा अध्यक्ष किन्नरीताई सोनार, साजिद अन्सारी, ओबीसी अध्यक्ष अनामिकाताई चौधरी,उपाध्यक्ष पंकज सोनार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रमाशंकर माली,जॅकी शिकलीकर,निहाल पठाण,महेश पाटील,प्रशांत कुलकर्णी, प्रशांत कदम,भावना लोहार,रुपमताई सोनी,रूपेश पाटील तेजस सराफ,अब्बास भाई,सलमान मनियार व असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.







