कॅन्सर दिनानिमित्त अंधेरीच्या व्यसनमुक्त केंद्र येथे नशाबंदी मंडळाचा कार्यक्रम

cancer-day-celebration-in-andheri

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – अंधेरी येथील भरडावाडीतील अंमली पदार्थ व्यसनमुक्त केंद्रात बृहन्मुंबई महानगरपालिका कुटुंब कल्याण व माताबाल संगोपन विभाग, महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नशामुक्त भारत अभियान तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तर्फे गुरुवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी, दुपारी २ वाजता कॅन्सर दिनानिमित्त नशामुक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी अंमली पदार्थ व्यसनमुक्त केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. वैभव गंगावणे, डॉ. विजय मकवाना उपस्थित होते. हा कार्यक्रम नशाबंदी मंडळाच्या मुंबई जिल्हा संघटिका सौ. दिशा कळंबे यांनी उत्तमरित्या पार पाडला. कळंबे यांनी वैद्यकिय अधिकारी यांना भारतीय संविधान कलम ४७ ची प्रत दिली. तसेच पोस्टर प्रदर्शन ही केले. कॅन्सर दिनानिमित्त त्यांनी संदेश देऊन जनजागृती ही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here