युट्यूबरचे आव्हान स्वीकारून दीड लिटर दारू प्यायल्याने वृद्धाचा मृत्यू

death

मास्को – ‘अति तिथे माती’ ही म्हण आपल्याला माहित आहेच. पैशांची हाव आणि आपण कोणतेही आव्हान स्वीकारून ते पूर्ण करू शकतो, हा अतिआत्मविश्वास एका वृद्धाच्या जीवावर बेतला आहे. रशियामधील 60 वर्षांच्या वृद्धाने पैशांसाठी एका यूट्यूबरचे दारूपिण्याचे आव्हान स्विकारले. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

सध्या सोशलमिडीयावर ह्या वृद्धाने स्विकारलेल्या आव्हानाची चर्चा सुरू आहे. हल्ली सोशलमिडीयावर वेगवेगळ्या माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करून स्टंटद्वारे लोकांचे मनोरंजन करण्यात येते. त्यातून पैसे कमवण्याचा फंडा सध्या सुरू आहे. रशियामधील स्मोलेन्स्क शहरात अशाच एका यूट्यूबरने लोकांना पैशांचे प्रलोभन दाखवत लोकांना एका स्टंटचे आव्हान द्ले होते.

यूट्यूबरने आव्हान दिले की, जो व्यक्ती जास्तीतजास्त दारू पिणार, त्याला मोठ्या रकमेचे बक्षीस देण्यात येईल. याचे थेट प्रक्षेपण होणार होते. असे प्रक्षेपण ‘ट्रैश स्ट्रीम’ नावाने ओळखले जाते. हल्ली सोशल मिडीयावर याची चर्चा आहे. यात लोकांना पैशांच्या मोबदल्यात अपमानास्पद काम किंवा स्टंट करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. तसेच असे स्टंट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या जास्त आहे.

यूट्यूबरने दिलेले आव्हान वृद्धाने स्विकारले. व त्यांनी थेट प्रक्षेपणात दारू पिण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही वेळातच ते जमिनीवर कोसळले. अनेक प्रेक्षक हे सर्व कुतुहलाने बघत होते. वद्धाने सुमारे 1.5 लिटर दारू एकाचवेळी घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचे थेट प्रक्षेपण अनेक प्रेक्षक बघत होते.

रशियातील अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात स्मोलेन्स्क शहरात घडलेल्या घटनेचा तपास सुरू केला आहे. रशियन सिनेटचे सदस्य अलेक्सी पुष्कोव्ह यांनी जे सोशल मीडियावर अशा स्टंटना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here