महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन(लालबावटा) यांचे रास्ता रोको आंदोलन

maharashtra-farmer-rally-in-nandurbar

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्ह्यातील शहादा येथे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा )कडून शेतकरी विरोधी तिने काळे कायदे रद्द करण्यासाठी शहादा _धुळे महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

lalbavata-andolan-nivedan

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले .केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी तिन काळे कायदा रद्द करून शेतमालाला किफायतशीर भाव देण्याबाबत सुधारित कायदे करण्यात यावेत शेतकऱ्यांवरील खोट्या केसेस त्वरित मागे घेण्यात यावेत तसेच 2020 वीजविधेयक ताबडतोब रद्द करण्यात यावेत अशा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आले.

lalbavata-morcha-in-nandurbar

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व शहर शेतकरी संघटना कामगार संघटना व शेतमजुरांच्या संघटना अशा जवळपास देशातील पाचशे संघटनांनी जाहीर पाठिंबा देऊन एकता किसान संयुक्त मोर्चा स्थापन करून रास्ता रोको आंदोलन हा एक भाग म्हणून करण्यात आले आहे.

nandurbar-andolan-nivedan

आंदोलनकर्त्यांना पोलीस प्रशासनामार्फत अटक करून नंतर सोडण्यात आले. लालबावटा संघटनेकडून केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.आंदोलन करतांना महाराष्ट्र राज्य शेत मजूर युनियनचे तालुका सेक्रेटरी सुनील गायकवाड, संतोष गायकवाड,भिका ब्राह्मणे,राजू ठाकरे व इतर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here