पॉर्न व्हिडीओ प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री गहना वशिष्टला अटक

gahana-vashisth

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून मुलींना पॉर्न व्हिडीओत काम करण्यासाठी भाग पाडणाऱ्या एका मॉडेल- अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या रॅकेटप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

गहना वशिष्ट असं या अभिनेत्रीचं नाव आहे. मिस एशिया बिकनी किताब मिळवलेली अभिनेत्री, मॉडेल गहना वशिष्ट सध्या पॉर्न व्हिडीओ प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. गहना वशिष्ट या अभिनेत्रीने हिंदी, तेलगु चित्रपटांमध्ये काम केले आहे. पोलिसांना मालाड-मालवणी या परिसरात पॉर्न व्हिडीओ बनवले जात असल्याची माहिती मिळाली होती.

चित्रपटात काम करण्यासाठी नवीन चेहरे हवे असल्याची फसवी जाहीरात काही माणसं करत आहेत. नंतर ती माणसं त्यांना एका बंगल्यात बोलावून अश्लील सीन करायला लावतात. त्यांना जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एक अॅग्रीमेण्ट करुन घेतात आणि नंतर त्यांना पॉर्न व्हिडीओसाठी काम करायला भाग पाडतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शुक्रवारी मालाड-मालवणी या परिसरातील ग्रीन पार्क नावाच्या एका बंगल्यात धाड घातली. त्या धाडीत दोन अभिनेते, एक लाईट मॅन, एक महिला फोटोग्राफर आणि ग्राफिक डिझायनर यांना अटक केली. त्याचबरोबर घटनास्थळावरून हाय डेफिनिशन व्हिडीओ कॅमेरा, सहा मोबाईल फोन, एक लॅपटॉप, एक कॅमेरा स्टॅण्ड, व्हिडीओ क्लिप्सने भरलेले मेमरी कार्ड जप्त केली आहेत. त्यानंतर चौकशी केली असता गहना वशिष्ट हिचे नाव समोर आले.

शनिवारी मुंबई पोलिसांनी गहनाला अटक केली आहे. या अभिनेत्रीने 87 पॉर्न व्हिडीओ शूट करून एका वेबसाईटवर अपलोड केले असल्याचा आरोप तिच्यावर आहे. ही वेबसाईट हे व्हिडीओ पाहण्यासाठी 2000 रुपये सदस्यता शुल्क आकारत होती. तीन बॅंक अकाऊंट जप्त केले आहेत. ज्यामध्ये अॅडल्ट अॅपच्या माध्यमातून कमावलेले 36 लाख रुपये आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी या रॅकेटमधून एका महिलेची सुटका केलेली आहे. आज तिला न्यायालयात उभे केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here