मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेत्री सनी लिओनी वादात अडकली आहे. सनीने 29 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप तिच्यावर झाला असून या प्रकरणी क्राईम ब्रांचकडून तिची चौकशी करण्यात आली आहे. सनीने आपल्यावरी सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.
सनीए लियोनीने एका इव्हेंट कोऑर्डिनेटरकडून 2016 साली 29 लाख रुपये घेतले होते. यासाठी सनीला काही कार्यक्रमांना हजेरी लावायची होती. सनीने पैसे घेतले, मात्र ती कुठल्याही कार्यक्रमाला आली नसल्याचे आरोप इव्हेंट कोऑर्डिनेटरकडून करण्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पैसे दिल्याचे सर्व पुरावेही सादर केले आहेत.
या प्रकरणी क्राईम ब्रांचकडून सनीची चौकशी करण्यात आली. तेव्हा सनीने सर्व आरोप फेटाळून लावले. आपण कुठल्याही कार्यक्रमाला हजर झाले नाही, कारण आयोजकांनी प्रत्येक वेळी कार्यक्रम पुढे ढकलला. आयोजकांनी एकाही कार्यक्रमाची तारीख स्पष्टपणे सांगितली नाही. तसेच आजही आपण कार्यक्रमाला हजर राहू अशी ग्वाहीही सनीने दिली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत असून तक्रारदाराचीही बाजू पोलीस समजून घेणार आहेत.







