खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – परभणी जिल्ह्यात शिक्षक बंधु भगिनीवर प्रशासनाकडुन नेहमीच अन्यायकारक पत्र काढुन अन्याय केला जातो. गेल्या एक वर्षापासुन जिल्हा प्रशासनाने काढलेली सर्व पत्रे आम्ही अभ्यासली असून,महाराष्ट्रात कुठेही अंमलात न आलेले कायदे,पत्र फक्त परभणीतच आमलात येतातच कसे ? परभणी काही महाराष्ट्रात नाही का? शासनाचे धोरण वेगळे व परभणी जिल्ह्यासाठी धोरण वेगळे हे आता चालणार नाही. ” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदयजी शिंदे यांनी केल्याचे औरंगाबाद जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी कळविले आहे.
परभणी जिल्ह्यात नुकतेच बायोमट्रीक उपस्थिती घेणे संदर्भात पत्र मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले असुन यासंदर्भात राज्याध्यक्ष यांनी धावती भेट गंगाखेड येथे दिली असता शिक्षक बांधवासोबत ते बोलत होते.
“परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी हे शिक्षक बांधवांना कोणीही वाली नाही असे समजुन वागतात…व अन्यायकारक पत्र काढतात.त्यांचे अनेक पत्र आम्ही अभ्यासले आहेत….त्या अनुषंगाने माझा,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना इशारा आहे की जर हे असेच चालु राहीले तर आम्हाला तिव्र आंदोलन करावेच लागेल.
यासंदर्भात लवकरच पत्रव्यवहार केला जाणार असुन.सात दिवसाचे आत जर हे पत्र परत घेतले नाही तर कार्यकारी अधिकारी यांचे दालानासमोर तिव्र आंदोलन केले जाणार असल्याचे ते म्हणाले.”
या वेळी लाकडाऊन कालावधीत फक्त परभणीतच कसे वेगवेगळे पत्रे काढुन शिक्षकांस वेठीस धरण्यात आले, ही बाब समिती पदाधिकारी यांनी निदर्शनास आणुन दिली,तेंव्हा आता बस झाले खुप अन्याय सहन केला,आता नाही..”अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो” या डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याची त्यांनी आठवन करुन दिली,व सर्वांनी एकत्रीतपणे अन्यायाच्या विरोधात पेटुन उठण्याचे आवाहन त्यांनी केले
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष सिताराम लटपटे,समिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सिरसाठ,गंगाखेड तालुकाध्यक्ष पांडुरंग आंधळे,कार्याध्यक्ष लक्ष्मण मुंढे,सिध्देश्वर मुंढे, वाल्मिक सानप,शिवराम सोनवने,नागनाथ गोरगीळे,जिल्हा संघटक भागवत कातकडे,जिल्हा कार्याध्यक्ष नारायण तांदळे,सह शिक्षक समितीचे पदाधिकारी मोठ्या संखेने हजर होते.







