जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथील गोरजाबाई जिमखान्याची बैठक दिनांक 7 फेब्रुवारी रोजी माजी अध्यक्ष श्री रजनीकांत सेठ कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली खेडी मेडीच्या वातावरणात संपन्न झाली.

सर्वांनुमते गुरुमुख सेठ जगवाणी मा.आमदार यांची एकमताने अध्यक्षपदी तर माजी महापौर ललितभाऊ विजयराव कोल्हे यांची चेअरमन पदी तर राजेश मुंदडा उर्फ गोगासेठ यांची सचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
संचालक पदी महानगरपालिकेचे गटनेते भगत सेठ बालानी, जवाहर जानी,मनोहर पाटील,महा न.पा.शिवसेनेचे गटनेते सुनील महाजन,मा.नगराध्यक्ष पी एम पाटील, विजू सेठ जैन, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अभिषेक पाटील,देवराम सेठ पटेल,यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.







