बॉलीवूड अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

rajeev-kapoor

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलीवूड अभिनेता, निर्माता राजीव कपूर यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबईत त्यांच्या राहत्या घरी दुपारी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना इनलिंक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तेथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत राजीव कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रणधीर यांनी राजीव यांचं निधन झाल्याचं सांगितलं. भावाच्या निधनाबद्दल रणधीर म्हणाले की, ‘आज मी माझ्या छोट्या भावाला राजीवला गमावलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.’

राजीव कपूर अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक होते. राजीव कपूर यांनी आपल्या करिअरची सुरूवात ‘जिम्मेदार’ या चित्रपटातून केली होती. तथापि, त्यांना खरी ओळख राज कपूर दिग्दर्शित 1985मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून मिळाली. चित्रपटात राजीव यांच्यासोबत अभिनेत्री मंदाकिनी मुख्य भूमिकेत झळकली होती. या दोघांनाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. या शिवाय त्यांनी आसमान (1984), लवर बॉय (1985), जबरदस्त (1985) और हम तो चले परदेस (1988) चित्रपटात काम केले आहे. अभिनयात यश न मिळाल्यानंतर राजीव यांनी पुन्हा निर्माता म्हणून काम करण्यास सुरूवात केली. तसेच ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘प्रेम ग्रंथ’ हा चित्रपट राजीव कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. त्यांनी ‘हिना’ आणि ‘आ अब लौट चले’ यासारख्या चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here