कुर्ला भाभा रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने शवविच्छेदनास उशीर

anil-galgali

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – कुर्ला भाभा रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने शवविच्छेदनास उशीर झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 5 तासांच्या विलंबानंतर स्थानिक एनजीओ तर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्यानंतर मृतक चंद्रकांत मदने यांस राजावाडी शवविच्छेदन केंद्रात पाठविण्यात आला.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांस लेखी तक्रार केली आहे. चंद्रकांत मदने यांचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी राजावाडी शवविच्छेदन केंद्रात घेऊन जाण्यासाठी रुग्णालयाकडे रुग्णवाहिका नव्हती. 5 तास प्रतीक्षा केल्यानंतर नातेवाईकांनी मनराज प्रतिष्ठानकडे रुग्णवाहिकेची मदत मागितली आणि मदत मिळाली.

अनिल गलगली यांच्या मते नुकत्याच अर्थसंकल्पात आरोग्य विभागावर कोट्यवधीची तरतूद करण्यात आली असताना रुग्णालयात रुग्णवाहिकेसारखी व्यवस्था नाही. कुर्ला सारख्या गजबजलेल्या रुग्णालयात साधन सामुग्री असणे आवश्यक आहे. सदर प्रकरणाची चौकशी करत संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

http://fb.watch/3yeUZnFhNB/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here