खोपोली (प्रतिनिधी) – पुरोगामी पत्रकार संघाच्या चौथा वर्धापन दिन खोपोली येथे महाराजा डॉन मध्ये थाटात संपन्न झाला. श्रीमंत महाराज रोहित राजे पवार, संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, सचिव प्रवीण परमार,सुनिता तोमार ,डॉन के के, श्री. अडांगळे यांचे हस्ते छायाचित्रकार, पत्रकार ,कवी ,लेखक सुभाष शांताराम जैन यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या अनेक बातम्या फोटो, छायाचित्र समस्या चित्र अनेक दैनिकातून, न्यूज पोर्टल चॅनेलवर प्रकाशित झालेली आहेत. अनेक समस्या चित्रांवर कार्यवाही झालेली आहे.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे मित्र आप्त, समाजातील मान्यवर व्यक्ती सर्व पत्रकार बंधु यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी ठाण्याचे पत्रकार किरण चव्हाण, युवराज राजपूत, राजेंद्र पवार यांनाही स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.







