मनोज बाचले यांना कला भूषण पुरस्कार व शरद वांढरे यांना साहित्य भूषण पुरस्कार 2021 जाहीर

vardha-news

वर्धा (समुद्रपूर जिल्हा प्रतिनिधी रिंकेश जुमडे) – रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पुलगाव द्वारा संचालित मुक्ताबाई विद्यालय, समुद्रपूर जिल्हा वर्धा येथील शाळेतील कला शिक्षक श्री. मनोज बाचले यांना अखिल भारतीय पत्रकार संघ -नाशिक तर्फे राष्ट्रीय सेवा व कार्य गौरव कला भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

मनोज बाचले गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक क्षेत्रात कार्याची दखल घेऊन यांना कला भूषण पुरस्कार 2021 साठी निवड करण्यात आली. श्री बाचले यांनी कोविड-१९च्या भयानक परिस्थिती असूनही शाळा बंद असले, तरी विद्यार्थ्यांशी सतत संपर्क साधून विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षणात ऑनलाईन स्पर्धा, उपक्रम परीक्षा विद्यार्थ्यांपर्यंत पोचविले. जे विद्यार्थी ऑनलाईन चे कोणतेही साधन नसल्याने श्री. बाचले व श्री. वांढरे यांनी विद्यार्थ्यांची घरोघरी जाऊन शिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये नवीन उत्साह निर्माण केला. शाळेतील शिक्षकांची टीम तयार करून covid-19 च्या काळात विद्यार्थ्यांपर्यंत ऑफलाईन शिक्षण देऊन विद्यार्थ्यांपर्यंत नवीन उत्साह निर्माण केला.

वर्ग दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शरद वांढरे यांनी समुपदेशशाची मूलभूत ओळख करून देणारा हा अभ्यासक्रम प्रत्येकला नक्कीच उपयोगी ठरेल हे विद्यार्थ्यांना पटवून देतात.या सर्व कार्याची दखल घेऊन शरद पांढरे यांना साहित्य भूषण पुरस्कार घोषित करण्यात आला. शाळेतील श्री. कलाशिक्षक मनोज बाचले, शरद वांढरे यांनी शाळेचे अध्यक्ष सुधाकरराव घोडे, मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना शिंदे शिक्षक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले 2 मार्च 2021 स्थळ कालिदास कला मंदिर, शालिमार नाशिक वेळ दुपारी एक बारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामदासजी आठवले केंद्रीय समाज कल्याण मंत्री भारत सरकार, छगनरावजी भुजबळ पालकमंत्री आशिष जाधव संपादक झी24तास न्युज सतिश कुलकर्णी महापौर पुणे व इतर मान्यवर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here