पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, तीन महिलांची सुटका

massage-center-brothel

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. त्याठिकाणाहून मेघालय आणि मिझोराम येथील 3 तरुणींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन महिलांवर पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. के. बी. फुंग्रेआ माया (वय – 29) आणि नीतू रोशा यांच्याविरूद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाणेर परिसरातील आराया स्पा अँड सलून येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाने मंगळवारी सायंकाळी कारवाई करून त्याठिकाणाहून दोन मेघालय आणि एक मिझोराम येथील तरुणींची सुटका केली.

तरुणींना पैशांचे प्रलोभन दाखवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले होते. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, राजेंद्र कुमावत, आण्णा माने, संतोष भांडवलकर, राजश्री मोहिते, मनिषा पुकाळे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here