अखेर कंगनाने घेतली माघार, अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी बीएमसीकडे करणार अर्ज

kangana-ranuat

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबई महापालिकेनं बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या घरात अनधिकृत बांधकाम तोडण्याची नोटीस पाठवली होती, याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. स्वत: कंगनाने याबद्दल निर्णय घेतला आहे.

मुंबईतील खार येथील कंगनाच्या घरात अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवण्यात आला होता. या बद्दल मुंबई पालिकेनं कंगनाला नोटीस बजावली होती. याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी, घरात असलेल्या अनधिकृत बांधकाम तोडकाम प्रकरणी याचिका कंगनाकडून मागे घेण्यात आली आहे. जे काम अनधिकृत आहे, ते अधिकृत करण्यासाठी कंगना रनौत मुंबई पालिकेकडे रितसर अर्ज करणार आहे. याबद्दल मुंबई पालिकेनं पुढील चार आठवड्यामध्ये कंगनाच्या अर्जावर काय निर्णय घेतला ते जाहीर करावे असा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेला दिला आहे. तसंच, अनधिकृत बांधकाम तोडकामाला स्थगिती कायम राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

तसंच, बीएमसीच्या आदेश कंगनाच्या विरोधात गेला तर बीएमसी कंगनाच्या विरोधात अपील करू शकते, यासाठी 2 आठवड्यांचा अवधी असणार आहे. निर्णय कंगनाच्या विरोधात जरी गेला तरी दोन आठवडे बीएमसीला कोणतीही कारवाई करता येणार नाही.

काय आहे प्रकरण?
मुंबईतील खार वेस्ट येथील आर्चिड ब्रीझच्या 16 नंबर रोडवरील एका बिल्डिंगमध्ये कंगना रणौतचा एक फ्लॅट आहे. बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर कंगना राहाते. विशेष म्हणजे पाचव्या मजल्यावर कंगनाचे एकूण तीन फ्लॅट आहेत. त्यापैकी एक फ्लॅट 797 स्क्वे.फू. दुसरा फ्लॅट 711स्क्वे.फू. आणि तिसरा फ्लॅट 459 स्क्वे.फू. आहे. तिन्ही फ्लॅट्स कंगनाच्या नावावर आहेत. 8 मार्च 2013 रोजी तिन्ही फ्लॅटची रजिस्ट्री झाली होती.

कंगना हिनं फ्लॅट घेतल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 13 मार्च 2018 रोजी बीएमसीकडे एक तक्रार आली होती. तिनं फ्लॅट्समध्ये बेकायदा बांधकाम केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. तक्रार मिळाल्यानंतर 26 मार्च 2018 रोजी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या या फ्लॅट्सची पाहाणी केली होती. त्याच दिवशी कंगनाला BMC under 53/1 of MRTP act for unauthorized construction beyond plan नुसार नोटिस बजावण्यात आली होती. या नोटिशीला 27 मार्च 2014 रोजी बीएमसीच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here