मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – यावर्षीची मिस आणि मिसेस दादरचा किताब कोण पटकावणार, याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळणार आहे. मिस आणि मिसेस दादर 2021 या स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले आहे.
सध्याची परिस्थिती आणि सोशल डिस्टन्सिंगचे भान राखून या स्पर्धेची पहिली फेरी होईल. त्यात निवड झालेल्या स्पर्धकांना विविध क्षेत्रातील तज्ञांचे ऑनलाईन व प्रत्यक्ष ट्रेनिंग देण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष मंचावर सध्याच्या सर्व नियमांचे पालन करून अंतिम सोहळा रंगेल. स्त्रियांमधील आत्मविश्वास, त्यांच्यातील कलागुण, फिटनेस आणि तेज आदी कलागुणांचा विचार करून विविध क्षेत्रातील मान्यवर परीक्षक मिस आणि मिसेस दादरची निवड करतील अशी माहिती आयोजिका मनाली कामत यांनी दिली.
स्पर्धेत दादरमध्ये आधी राहणाऱ्या आणि सध्या राहत असणाऱ्या कोणीही स्त्रिया सहभागी होऊ शकतात. विशेष म्हणजे ही स्पर्धा तीन टप्प्यात होणार असून त्यात अविवाहितांची ‘मिस दादर’ श्रेणी असेल. ‘मिसेस दादर’ ही 50 पेक्षा कमी वयाची विवाहितांची श्रेणी असून आहे. 50पेक्षा जास्त किंवा आजी असणाऱ्यांसाठी विशेष श्रेणीदेखील आहे. अंतिम सोहळा 27 फेब्रुवारी रोजी पार पडणार असून डॉक्टर संदेश मयेकर, गायत्री जोशी, अमेय खोपकर आदी मान्यवर परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.







