महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी नितींन मनोहर शिंदे यांची बिनविरोध निवड

nitin-manohar-shinde

ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – पत्रकार म्हणजे समाजातील प्रश्नाबद्दल, लोकांच्या अन्याय आत्याचाराबद्दल जो अस्वस्थ होतो, कुठेतरी त्याच्या मनामध्ये वेदना असते तोच खरा पत्रकार असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वंसतराव मुडें यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यकारणीची बैठक गुरूवार दि. 11फेब्रुवारी रोजी महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वंसतराव मुडें,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली.यावेळी महाराष्ट्र राज्य प्रसिध्दि प्रमुख नवनाथ जाधव, राज्यमाध्यम सल्लागार भगवान राऊत, कोकण विभागीय अध्यक्ष नितींन शिंदे, पालघर जिल्हा अध्यक्ष विकास पाटील, कोकण विभागीय सरचिटणीस किशोर पाटील, ठाणे शहर जिल्हा मुख्य कार्यकारिणी प्रकाश दळवी, मिलींद दाभोळकर, सतीशकुमार भावे, ज्योती चिदंरकर, अतुल तिवारी, मंगेश प्रभुळकर,संजय भोईर,मनोज कदम,आखिलेश पाल यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

maharashtra-rajya-marathi-patrakar-sangh

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वंसतराव मुडें म्हणाले की, कोरोना काळामध्ये अनेक पत्रकांराचा मुत्यू झाला तर कोरोना काळामध्ये अनेक पत्रकारांना कामावरून कमी केले गेले तसेच काही पत्रकारांचे वेतन निम्मे करण्यात आले तसेच कोरोना काळामध्ये वर्तमानपत्र कमी झाले जाहीरातींचे प्रमाण कमी झाले या सगळ्या अडचणी चा फटका पत्रकारांना झाला आहे या क्षेत्रात काम करणार्या लोकांवर आला आहे औरंगाबाद मध्ये संपादकांची गोलमेज परिषद आयोजित करून वृत्तपत्र व्यवसायातील अडचणींवर चर्चाकरून मार्ग काढण्यात आला वृत्तपत्र व्यवसाय टिकवण्यासाठी वृत्तपत्राची किमंत वाढवली पाहिजे हे पटवून दिले त्यामुळे सांगली मराठवाड्यासह राज्यातील अनेक दैनिकांची किमंत वाढवली पत्रकार संघ हा आपला कुटूंब आहे पत्रकार संघटनेच्या माध्यमातून काय केले पाहिजे तसेच आपण ही संघटना अधिक सक्षम कशी करता येईल चांगुलपणा कसा वाढवता येईल या विषयी चर्चा केली.

यावेळी कोकण विभागीय सरचिटणीस किशोर पाटील यांची निवड करण्यात आली तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारणी मध्ये ॲड. रचना भालके यांची निवड करण्यात आली राज्यमाध्यम सल्लागार भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले .यावेळी बैठकीस पत्रकार संघाचे मिनल पवार, सुभाष शांताराम जैन, सतीश कुदंळे, अभिषेक चव्हाण, अमित गुजर, ख्वाजा शेख, गणेश गव्हाणे,सुबोध कांबळे,नरेंद्र गुप्ता, देवेंद्र शिंदे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here