निशाने ग्रामपंचायतवर शिवसेना भगवा फडकणार!

p-m-patil

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – निशाने ग्रुप ग्रामपंचायत एकुन सात सदस्य निवडून आले असून सौ मनीषा योगेश पाटील यांची सरपंचपदी वर्णी लागणार असून उपसरपंचपदी काशीनाथ भागवत पाटील (भैय्या) शिवसेना शाखा प्रमुख यांची वर्णी लागणार आहे.

निवडून आलेले सदस्य सौ मंगलाबाई रविंद्र पाटील,श्री शशिकांत नाना बोरसे असे 4 सदस्याचे पूर्ण बहुमत आहे. निवडून आलेल्या सर्व सदस्याचे मा.ना.गुलाबरावजी पाटिल पालक मंत्री, मां.श्री.गुलाबराव वाघ जिल्हा प्रमुख यानी त्याना शुभेच्छा दिल्यात.

त्यांचा सत्कार महाराष्ट्र दिव्यांग महासंघाचे अध्यक्ष मा.नगराध्यक्ष पी.एम.पाटील सर यानी केला. सर्व सदस्याना मोती अप्पा पाटील,किरण पाटील,रामदास पाटील,प्रताप पाटिल,हेमराज पाटिल,ज्ञानेश्वर पाटिल, भटू पाटिल,रमेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here