बस-ट्रकचा भीषण अपघात; 14 जण जागीच ठार

andhra-pradesh-bus-accident

मदारपूर (आंध्र प्रदेश) – येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 14जण जागीच ठार झालेत तर चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाले आहेत. मिनी बसमधून चित्तूर जिल्ह्याकडून हैदराबादच्या दिशेने जात होता. बसमधील सर्वजण राजस्थानातील अजमेरला जात होते होते. दरम्यान, पहाटे चार वाजताच्या सुमारास कर्नूल जिल्ह्यातील वेलदूर्ती हद्दीत असलेल्या मदरापूर गावाजवळ बसने विरुद्ध दिशेकडून येत असलेल्या ट्रकला धडक दिली.

प्राथमिक अंदाजानुसार चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. बस आधी डिव्हायडरला जाऊन धडकली. डिव्हायडर तोडून बसने ट्रकवर जाऊन आदळली. बस आणि ट्रकचा वेग प्रचंड असल्यानं या भयंकर अपघातात १३ जण जागीच ठार झाले, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कर्नूल जिल्ह्यातील मदारपूर गावात ही अपघाताची घटना घडली. अपघातानंतर पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य वेगाने सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here