उद्यापासून टोलनाक्यावर फास्टॅग अनिवार्य

fastag

नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना फास्ट टॅग अनिवार्य केले आहे. याची अंलबजावणी उद्या 15 फेब्रुरीपासून करण्यात येणार आहे. म्हणजे आज रात्री 12 वाजल्यापासून ही फास्ट टॅग अनिवार्य आहे. फास्ट टॅग नसेल तर उद्यापासून तुम्हाला दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल.

जर तुमच्या गाडीवर फास्ट टॅग लावले नसेल तुम्हाला मार्शल लेनमध्ये प्रवेश मिळणार नाही. मात्र जर तुम्ही फास्ट टॅगच्या लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या गाडीचा जेवढा टॅक्स असेल त्याच्या दुप्पट टॅक्स भरावा लागेल.
फास्ट टॅग पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.
जर फास्ट टॅग एनएचएआय प्रीपेड वॉलेटशी जोडले असेल तर याला रिचार्ज करता येते. हे युपीआय/डेबिट या क्रेडिट कार्ड/NEFT/नेट बँकिंग आदि माध्यमातून रिचार्ज करु शकता. जर बँक खाते फास्ट टॅगशी जोडले असेल तर पैसे खात्यातून कट होतील. तुम्ही पेटीएम वॉलेटला फास्ट टॅगशी जोडल्यास वॉलेटमधून तुम्ही रिचार्ज करु शकता.

फास्ट टॅग खात्यात मिनिमम बॅलन्सची अनिवार्यता आता काढून टाकण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिचार्ज करु शकता. फास्ट टॅगची वैधता जारी झाल्यापासून पाच वर्षे आहे. रिचार्ज केल्याने ही वैधता वाढत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here