स्मरणशक्ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना इंजेक्शन देणाऱ्या शिक्षकावर कारवाई

injection

नवी दिल्ली – ज्ञानदानाचं काम हे अतिशय पवित्र असतं. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये आदर आणि विश्वास असतो. मात्र या विश्वासालाच तडा देणारं काम मुलांची शिकवणी घेणाऱ्या एका व्यक्तीनं केलं आहे.

हा 20 वर्षीय व्यक्ती विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घ्यायचा. त्यानं शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉर्मल सलाईन सोल्युशन्स इंजेक्शनच्या माध्यमातून दिली. पोलिसांनी संदीप नावाच्या आरोपीला याप्रकरणात अटक केली. हा संदीप बीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. तो विद्यार्थ्यांचे विनामूल्य क्लासेस घ्यायचा. पूर्व दिल्लीतील मांडवली इथं हा प्रकार घडला.

पोलीस म्हणाले, हा प्रकार तेव्हा उजेडात आला, जेव्हा एका विद्यार्थ्यांच्या पालकानं त्याच्या पाल्याला हे इंजेक्शन घरात घेताना पाहिलं. तपासात समोर आलं, की या मुलांना एनएस अर्थात (नॉर्मल सलाईन) सोल्युशन्स ही शिकवणी घेणारी व्यक्ती देत असे. संदीप म्हणाला, की त्यानं युट्युबवर पाहिलं होतं, की मुलांची स्मरणशक्ती अशा एनएस सोल्युशन्स दिल्यानं वाढते. मांडवली पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. आहे असं पूर्व दिल्लीचे डीसीपी संदीप यादव म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here