…अन् भाषण सुरु असतानाच गुजरातचे मुख्यमंत्री स्टेजवर कोसळले

vijay-ruani

अहमदाबाद – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी भाषण सुरु असतानाच स्टेजवल कोसळले. रविवारी संध्याकाळी एका कार्यक्रमात त्यांचं भाषण सुरु होतं. भाषण सुरु असतानाच अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना सध्या सरकारी विमानातून अहमदाबादला नेलं जात आहे. ६४ वर्षीय विजय रुपानी २०१६ पासून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत.

विजय रुपानी यांची प्रकृती सध्या स्थिर असून ब्लड प्रेशर कमी झाल्याने त्यांना चक्कर आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. विजय रुपानी यांना अहमदाबादमधील युएन मेहता रुग्णालयात नेलं जाणार असून तिथे पूर्वकाळजी म्हणून त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here