मदतीच्या बहाण्याने पोलिसाने केली तरुणीकडे शारीरिक सुखाची मागणी

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – गुन्ह्यात अडकलेल्या भावाला मदत करण्याचा बहाण्याने एका पोलीस हवालदाराने तरूणीला लॉजवर घेऊन जात शरीर सुखाची मागणी करीत विनयभंग केला.

याप्रकरणी शिवाजीनगर मुख्यालयात कार्यरत असलेल्या हवालदाराविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादाराम ताकमोडे असे पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तरुणीच्या भावावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये होता. यादरम्यान संबंधित पोलीस हवालदार दादारामने मदत करण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीची ओळख करून घेतली.

तिचा मोबाईल नंबर घेऊन वेळीवेळी तिच्याशी बोलत राहिला. त्यांनतर 24 डिसेंबर 2020 रोजी लग्नासाठी स्थळ दाखविण्याचा बहाना करून त्याने तरूणीला पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करीत विनयभंग केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here