पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये रस्त्यावर महिलेचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हबीब बाबू शेख (वय 48) याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मागील एक वर्षापासून हबीब फिर्यादी महिलेला त्रास देत होता. 12 फेब्रुवारीला फिर्यादी महिला रस्त्याने जात असताना हबीबने तिचा पाठलाग केला. तिला शिवीगाळ करीत धमकी दिली. ‘तू मला खूप आवडते, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे’ असे म्हणत तिचा हात धरून जवळ ओढले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी महिलेने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. येरवडा पोलीस तपास करीत आहेत.






