दिराला खांद्यावर घेऊन तीन किलोमीटर काढली महिलेची धिंड

भोपाळ (मध्यप्रदेश) – भोपाळमधील एका महिलेला मारहाण करून तिच्या खांद्यावर नवऱ्याच्या नातेवाईकाला बसवून तिची धिंड काढण्यात आली. मध्य प्रदेशमधील गुणा जिल्ह्यात ही घटना घडली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून येते.

याबाबत सादर पोलिस ठाण्यात मारहाणीच्या कलमाखाली चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना अटक करण्यात आली आहे. परपुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप महिलेवर घेण्यात आला. नवऱ्याच्या नातेवाईकांना खांद्यावर घेऊन धिंड काढण्यात आली. नवरा व त्याच्या नातेवाईकांकडून तिला शिक्षा देण्यात आली. प्रकरणाविरोधात सदर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केली.

तक्रारीनुसार महिला व तिच्या नवरा दोघांच्या सहमताने वेगळे राहत होते. यानंतर सदर महिला परपुरुषासोबत राहत असल्याने यावर तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकांना आक्षेप होता. नातेवाईकांना महिला दुसऱ्या पुरुषासोबत राहणे मान्य नव्हते. त्यावरूनच हा वाद सुरू होता. या वादावरूनच नातेवाईकांनी तिला अशी शिक्षा दिली. दिराला खांद्यावर घेवून गावातून तिची धिंड काढण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी झाल्यावर चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here