नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या एक्स बॉयफ्रेन्डला पार्टीसाठी घरी बोलवून होणाऱ्या पतीच्या मदतीने त्याचा काटा काढला. या घटनेनंतर ती तरुणी आणि तिचा होणारा पती दोघेही फरार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गाजियाबादमधील वैशाली सेक्टर-४ मध्ये घडली. मृत व्यक्तीचं नाव नितिन चौधरी असून तो बी. कॉमचा विद्यार्थी होता. नितिन चौधरी व आरोपी तरुणी चार वर्षे रिलेशन होते. त्यानंतर दोघांमध्ये दोन महिन्यापूर्वी ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर त्या तरुणीचं सनी नावाच्या तरुणासोबत लग्न ठरलं. दोघांचा साखरपुडा झाला. नितीनला ब्रेकअप मान्य झाला नाही. नितीनला एक्स गर्लफ्रेंडचं लग्न ठरल्याची माहिती मिळाल्यानंतर तो तरुणीवर लग्न न करण्यासाठी दबाव टाकू लागला व त्रासही देवू लागला. या त्रासाला कंटाळून त्या तरुणीनं आपल्या होणाऱ्या पतीसोबत एक्स-बॉयफ्रेन्डचा काटा काढण्याचा प्लॅन केला.
तरुणीने नितिनला खोटं कारण सांगत पार्टीसाठी आपल्या घरी बोलवून घेतलं. तिचा होणारा पती सनीही या पार्टीसाठी उपस्थित होता. पार्टीत तिघांनीही दारू घेतली व त्या तरुणीने होणाऱ्या पतीसोबत मिळून एक्स बॉयफ्रेन्ड नितीनची हत्या केली. या घटनेनंतर ती तरुणी व तिचा होणाऱ्या पती फरार झाली आहे.







