ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – एपीएमसी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना सोमवारी खारघर पोलिस ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलिस हवालदार संतोष पाटील यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. सोमवारी त्यांनी रात्री 9 वाजून 30 मिनिटाने आत्महत्या केली आहे, आत्महत्या केल्या नंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे.
संतोष नामदेव पाटील (वय 47, रा. खारघर, सरस्वती को. ऑ. हौ. सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. संतोष पाटील यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन सोमवारी आत्महत्या केली आहे. पाटील हे खारघर पोलिस ठाण्यात 11 मार्च 2019 पासून कार्यरत होते. मात्र 30 जानेवारी 20121 पासून पाटील हे कामावर हजर झाले नाहीत. कामावर का येत नाही याची विचारपूस केल्या नंतर, तब्येत ठीक नसल्याचे कारण पोलिस ठाण्यात सांगितले होते.
मेडिकल दाखला देऊन पोलिस ठाण्यात हजर होतील या प्रतीक्षेत पोलिस ठाणे होते. मात्र सोमवारी रात्री साडे नऊ वाजता कुटुंबासोबत ते जेवले आणि त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. त्याचवेळी त्याच्या खोलीतील फॅनच्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजताच कुटुंबातील सदस्यांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माळी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोचून घटनेची महिती घेतील. पाटील यांच्या पश्चात दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे.






