आसारामला हार्ट ॲटॅक; जोधपूरमध्ये उपचार सुरू

जोधपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जेलमध्ये असलेला आसाराम बापू याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्येत बिघडल्यानंतर त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तब्येत बिघडल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

जोधपूरच्या जेलमध्ये बंद असलेल्या आसारामची मंगळवारी तब्येत बिघडली. त्याला तातडीने कारागृहातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्याला अधिक उपचारासाठी महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

२०१३ मध्ये अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी इंदोरमध्ये आसारामला अटक करण्यात आली होती. २०१८ मध्ये जोधपूर विशेष कोर्टाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here