मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – साहिल शेख आणि तश्कील कुरेशी अशी दोघा आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नरोल येथे एका फ्लॅटमध्ये कॅटरिंगमध्ये काम करणाऱ्या सहा महिला थांबल्या होत्या. तेव्हा ही घटना घडली. नरोल पोलिसांनी या प्रकरणी सोमवारी एफआयआर दाखल केला आहे. साहिल आणि तश्कीलविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही जुहापुरा येथील राहणारे आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, पीडित तरुणी सहा महिलांसोबत शनिवारी तेथे गेली होती. कॅटरिंग कंत्राटदाराने त्यांची नरोल येथील एका फ्लॅटमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. रात्री साडेदहाच्या सुमारास पीडित तरुणी आणि साहिल, तश्कील आणि साहिलची प्रेयसी हे चौघे बेडरूममध्ये दारू प्यायला बसले होते. तर सहा जणी या हॉलमध्ये होत्या. काही वेळाने चौघे जण बाहेर आले.
पीडित तरुणीला रात्री साडेअकरा वाजता दोघांनी उचलून बेडरूममध्ये नेले. त्या दोघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. घटना घडली त्यावेळी तिथे साहिलची प्रेयसीदेखील होती. या प्रकरणी नरोल पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







