कुख्यात गुंड शरद मोहेळला अटक

पुणे (प्रतिनिधी) – एका गुंडाची मिरवणुक तळोजा कारागृह ते पुण्यापर्यत निघणे हिच मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मात्र पुण्यातील गुंड गजानन मारणे यांची एका खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने त्याच्या समर्थकांनी जंगी मिरवणुक काढत शक्ती प्रदर्शन केले होते. या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर आता आणखी एक असेच प्रकरण समोर आले आहे. एका खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर पडल्यावर गुंड शरद मोहोळ याने एका कार्यक्रमा दरम्यान शक्ती प्रदर्शन केले. खडक पोलीसांनी त्याच्यासह पाच जणांनाअटक केली आहे.

एखाद्या गुंडाने अशाप्रकारे आपले शक्तीप्रदर्शन करणे आणि त्यावर पोलिसांनी हातावर हात ठेवून बघत बसणे कितपत योग्य आहे. असा सवाल बुलंद पोलीस टाईम्सच्या हितचिंतकांनी विचारला आहे. खुनाच्या गुन्ह्यातून शरद मोहोळ येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर एका संघटनेच्या पुरस्कार कार्यक्रमाला हजर राहिला होता. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन केले होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खडकी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here