पर्यटन संचालनालयातर्फे नाशिक विभागात पर्यटन महोत्सवाचे आयोजन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जिल्हा प्रशासन व प्रादेशिक पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च 2021 मध्ये पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार उपसंचालक पर्यटन संचालनालयामार्फत विभागात नाशिक जिल्ह्यात पक्षी महोत्सव, नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य 25 व 26 मार्च, 2021 रोजी ग्रेप हार्वेस्टिंग महोत्सव, ग्रेप पार्क रिसॉर्ट, नाशिक येथे 27 व 28 मार्च रोजी तर अहमदनगर जिल्ह्यात भंडारदर महोत्सव, भंडारदरा, तालुका अकोले याठिकाणी 6 व 7 मार्च रोजी तर धुळे येथे लळिंग किल्ला महोत्सव, लळिंग किल्ला, धुळे याठिकाणी 14 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.

विभागात आयोजित महोत्सवांमध्ये स्थानिक शेतकरी व आदिवासी यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, ट्रेकिंग, विविध विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्याने, छायाचित्र व चित्रकला स्पर्धा, किल्ले बनविण्याची स्पर्धा, ऐतिहासिक पोवाडा पर्यटनस्थळांची टूर, फॅशन शो, वाईन क्वीन स्पर्धा, पक्षी निरीक्षण, कृषी पर्यटन धोरणाबाबत मार्गदर्शन, शेती व त्यापासून विविध पदार्थ बनविणे, स्थानिक कलासंस्कृती, खाद्यपदार्थ व हस्तकला यांचे प्रदर्शन व विक्री, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध कार्यक्रमांची मेजवानी पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

तरी याठिकाणी त्यादिवशी पर्यटकांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन नितीनकुमार मुंडावरे, उपजिल्हाधिकारी तथा उपसंचालक पर्यटन संचालनालय, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here