हातमजूरी करणाऱ्या वृध्द बहीणभावाचे श्रीराम मंदिरासाठी दातृत्व

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी चित्रा चौधरी) – कुंभार खेडा येथील नारायण कोष्टी हे हात मजुरी करणारे व्यक्तीमत्व पण मनाने श्रीमंतांपेक्षा पण श्रीमंत अशा वृद्ध गृहस्थाने त्यांच्या कुंभारखेडा या गावात श्रीराम मंदीरासाठी देणगी जमा करणाऱ्या भक्तांना स्वतः बोलवून माझे पण माझ्या श्रीरामाच्या मंदीरा साठी १०० रु ची देणगी घ्या असे सांगून पैसे जमा केले.
चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे समाजातील काही व्यक्ती आपले कर्तव्य समजतात. अशा लोकांनीच या हातमजूरी करणाऱ्या वृध्दाकडून वर्गणी जमा करणाऱ्या भक्तांनी जबरदस्तीने वर्गणी जमा केल्याचा प्रचार सुरु केला. त्यामुळे या प्रकाराविषयी परिसरात उलटसुलट चर्चा सुरु झाली होती.

ही गोष्ट जेव्हा प.पू. जनार्दन हरीजी महाराज यांना समजल्यावर त्यांनी एकंदरीत काय प्रकार घडला आहे याची चौकशी करण्यासाठी स्वतः त्यांना भेटावयास गेले. त्यावेळेस नारायण कोष्टी यांनी मी माझ्यापरीने खारीचा वाटा म्हणून स्वेच्छेने वर्गणी दिल्याचे सांगितले. माझ्यावर कोणीही कसलाही दबाव न आणल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.kumbhar-kheda

हातमजुरी करणाऱ्या या बहीणभावांचे हातावर पोट असतांनाही त्यांनी पै पै करुन जमवलेल्या पैशातील १०० रुपये मंदिराला देण्याच्या दातृत्वाबद्दल महाराजांनी या दोघांचेही आभार मानले. तसेच या गावातच नाही तर संपूर्ण परिसरात तुमच्यासारखा श्रीमंत माणूस नाही, आज मी एका मनाने श्रीमंत असण्याऱ्या माणसाच्या शेजारी बसल्याचा मला गर्व असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

narayan-kosti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here