राम मंदिर निधी संकलनाच्या रॅलीत नाचणे पोलीस निरीक्षकाला भोवले

नांदेड – जिल्ह्यातील हगगाव येथे 14 फेब्रुवारी रोजी राम मंदिर निधी संकलनासाठी रॅली काढण्यात आली होती. यावेळी बंदोबस्तावर असलेले पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. रॅलीत डान्स करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. रॅलीत नाचल्याप्रकरणी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

रॅलीत सहभागी होऊन त्यांनी डान्स केला. आता पोलीस निरीक्षकच डान्स करायला लागले म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेतले. रॅलीत डान्स करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली. त्यानंतर हनुमंत गायकवाड यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशीअंती त्यांची बदली करण्यात आली. हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. आता त्यांचा जागी लक्ष्मण राख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here