जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील प्रख्यात रांगोळी कलाकार कावेरी पाटील यांनी तब्बल ३५ तास आपल्या कलेच्या माध्यमातून रांगोळीतून ६ बाय ८ आकाराची सुन्दर शिवप्रतिमा साकारली आहे.

कावेरी पाटील ह्या दरवर्षी शिवजयंती निमित्ताने रांगोळीच्या माध्यामातून वेगवेगळ्या शिवप्रतिमा साकारतात, यंदा देखील त्यांनी सुन्दंर अशी शिवप्रतिमा साकारली आहे. त्यांच्या या कलेचे शहरातून सर्वत्र कौतूक होत आहे.






