जादा पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने जेष्ठ महिलेला घातला गंडा

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – जादा पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने एका कंपनीने जेष्ठ महिलेला ४ लाख ५८ हजारांचा आर्थिंक गंडा घातला. याप्रकरणी ६१ वर्षीय महिलेने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साई इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या मालकासह इतर दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला कुटूंबिसासह बिबवेवाडी परिसरात राहायला आहे. साई इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या मालकासह इतर दोघांनी जेष्ठ महिलेचा विश्वास संपादित केला. त्यांची कंपनी परदेशात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असल्याचे सांगितले.

पैशांची गुंतवणूक केल्यास २५ टक्के व्याजदर देण्याचे आमिष कंपनीने महिलेला दाखविले. त्यानुसार फिर्यादी महिलेने ४ लाख ५८ हजारांची गुंतवणूक साई इन्व्हेस्टमेंट कंपनीत केली. मात्र, आरोपींनी त्यांना परतावा न देता फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सरला दसगुडे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here