पुण्यात मद्यपी चालकाकडून सहायक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) -संशयास्पद फिरताना अडविल्याचा राग आल्यामुळे मद्यपी वाहनचालकाने सहायक पोलीस निरीक्षकाला अपशब्द करून धक्काबुक्की केली. ही घटना गुरूवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पाषाणमधील लमाणतांडा परिसरात घडली. याप्रकरणी मोटारातील पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार आणि अंमलदार साळवी गुरुवारी पहाटे लमाणतांडा परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना परिसरात एक मोटार संशयास्पद फिरताना दिसली. त्यामुळे त्यांनी मोटार चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी मद्यपान करून वाहन चालवित असलेल्या चालकाने सहायक पोलीस निरीक्षक पवार यांना अपशब्द वापरून धक्काबुक्की केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एल. एस. उर्किडे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here