जळगाव (निलेश पाटील) – कोरोना लॉकडाऊनच्या दरम्यान तणावापासून नागरिकांनी दूर रहावे म्हणून जनमत प्रतिष्ठानतर्फे म्हणींची व कोविड डायलॉगची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. या स्पर्धेचा निकाल जाहीर होवून म्हणी स्पर्धेच्या विजेत्या सौ.शकिला रफीक तडवी यांना तर कोविड डायलॉग स्पर्धेचे विजेते आकाश भगवान माळी (देवपूर, धुळे) यांना पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
म्हणी स्पर्धेच्या विजेत्या सौ.शकिला रफीक तडवी यांना जनमत प्रतिष्ठानकडून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी शिक्षक भारती महिला अध्यक्ष शितल ताई जडे,, जन् मत अध्यक्ष पंकज नाले, हर्षाली पाटील उपस्थित होते.







