मुंबई पोलिसांनी मोटारसायकल चोरी करून अवैधरीत्या विक्री करणाऱ्या टोळीस केले जेरबंद

मुंबई (प्रतिनिधी) – सुरक्षीत पार्क केलेल्या दुचाकी मोटार सायकलवर पाळत ठेवुन संधी मिळताच बनावट चावीने सदर मोटार सायकलची चोरी करून सदर चोरीच्या मोटार सायकल अर्ध्या किमतीत विकी करणारी एक टोळी गोरेगांव परीसरात कार्यरत असलेबाबत विश्वसनीय बातमी गुन्हे शाखा, कक्ष ११ चे पोलीस पथकास प्राप्त झाली होती व त्यानुसार गोपनिय माहीती सुरू होती. सदर बातमीच्या आधारे दिनांक १५/०७/२०२० रोजी कक्ष ११ येथिल पथक काम करीत असताना नमुद टोळीचे दोन इसम चोरीची मोटार सायकल विकण्यासाठी मालाड पश्चिम, मुंबई येथे येणार असल्याची विश्वसनीय माहीती मिळाल्याने त्या अनुषंगाने कक्ष ११चे पथकाने सदर ठिकाणी पाळत ठेवली होती. दुपारच्या वेळी दोन तरुण हे त्यांचेकडील अॅक्टीवा मोटार सायकल कं. MH02-ED-5873 सह सदर ठिकाणी आले. त्यांचे वर्तन संशयास्पद आढळल्याने पोलीस पथकाने त्यांची विचारपूस केली असता त्यांनी असमाधानकारक उत्तरे दिली. सदर मोटार सायकल ही चोरीची असल्याची दाट संशय आल्याने सदर दोन्ही तरुण व मोटार सायकल ही ताब्यात घेण्यात आली. अधिक चौकशी केली असता सदर मोटार सायकल चोरी बाबत सहार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र. १३८/२०२० कलम ३७९ भा.द.वि.सं. प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे आढळले. नमुद इसमांना सदर गुन्हयात अटक करून त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी त्यांचे साथीदारांचे मदतीने आणखी चार मोटार सायकली चोरल्याची व त्यापैकी एक मोटारसायकल विकल्याची माहीती दिली. त्याबाबत अधिक तपास करुन त्यांचेकडून खालील नमुद चारही मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
१. MH-02-FH-4259 क्रमांकाची काळया रंगाची सुझुकी एसेस १२५ मोटार सायकल. २. MH-02-F-4222 क्रमांकाची सफेद रंगाची यामाहा मोटार सायकल. ३. MH-02-EB-7558 क्रमांकाची काळया रंगाची बजाज पल्सर २२० मोटार सायकल. ४. MH-03-AG-6189 क्रमांकाची काळया रंगाची बजाज पल्सर २२० मोटार सायकल. आरोपींकडून हस्तगत वर नमूद मोटारसायकल्सचे संबधाने आभिलेख तपासला असता हस्तगत मोटार सायकल चोरी गेल्याबाबत अनुक्रमे १) डी. एन. नगर पोलीस ठाणे गु.नों कं. २१० / २०२० कलम ३७९ भा.दं.वि.सं, २) एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु.नों .कं. २३९/२०२० कलम ३७९ भा.दं.वि.सं, ३) आरे पोलीस ठाणे गु.नों.कं. २६/२०१९ कलम ३७९ भा.दं.वि.सं, ४) साकीनाका पोलीस ठाणे गु.नों.कं. ६३७/२०२० कलम ३७९ भा.दं.वि.सं, प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पण्ण झाले आहे. सदर आरोपींसह नमुद गुन्हयात आणखी एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असून त्याचेविरूध्द उचित कारवाई करण्याकरीता संबधित पोलीस ठाण्यांना कळविण्यात आलेले आहे.
अटक केलेल्या आरोपींची टोळी असून ते वेगवेगळया मेक व मॉडेलच्या मोटार सायकली चोरतात. चोरलेल्या मोटार सायकलमधे छोटे प्रमाणत बदल करून बनावट नंबर प्लेट लावतात. त्यानंतर सदर टोळी ही कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या गरजू तरुणांना हेरुन सदर मोटार सायकली आर्ध्या किंमतीमधे विकत असल्याचे तपासात आढळले आहे. सदर आरोपींना पुढील कार्यवाहीकरीता साकीनाका पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उप-आयुक्त (प्र-१), अकबर पठाण यांच्या मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, (प्रकटीकरण-उत्तर) अविनाश शिंगटे, प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, पो.नि. रईस शेख, पो.नि. सलील भोसले, स.पो.नि. शरद झिने, विशाल पाटील, स.फौ. नरेंद्र मयेकर, अविनाश शिंदे, अंमलदार रविंद्र भांबिड, दिपक कांबळे, नितीन शिंदे, विनायक साळुखे, दिलीप वाघरे, सत्यनारायण नाईक, राजू गारे, संतोष माने, सुबोध सावंत, महादेव नावगे, राकेश लोटणकर, अजय कदम, सचिन कदम, जयेश केणी, निलेश शिंदे, महेश रावराणे, श्रीमती रिया अणेराव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here