कासारवडवली पोलीस स्टेशनची कारवाई; घरफोडी करणाऱ्या २ चोरट्यांना अटक

ठाणे (शफिक शेख) – कासारवडवली पोलीस स्टेशन हद्दीतील ब्रह्मांड येथे SAM VENTURES हे दुकान असून यातील फिर्यादी हे दिनांक २८.६.२०२० रोजी २१.०० वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते ते दिनांक २९.६.२०२० रोजी सकाळी ०७.३० वाजेच्या सुमारास दुकानात गेले असता त्यांनी दुकानातील ड्रॉव्हरमध्ये मालाची विक्री करून त्यातून आलेले रुपये ४०,०००/रोख रक्कम पाहिली असता त्यांना सदर रोख रक्कम त्यामध्ये नसल्याचे दिसून आल्याने सदर रोख रक्कम ही कोणीतरी चोरी केल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कासारवडवली पोलीस स्टेशन येथे गु.रजि. क्रमांक १७९/२०२० IPC ४५४,४५७,३८० प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्याचा प्रकार पाहता यातील आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करणे कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.किशोर खैरनार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि सागर जाधव व त्यांचे पथक यांना सूचना देवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते.त्याचप्रमाणे स. पो.नि सागर जाधव व त्यांचे पथक यांनी आरोपींचा शोध होणेकामी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासणी ,तांत्रिक मदत व बातमीदार यांना माहिती देवून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते.
दिनांक १६/७/२०२० रोजी पोलिसांना नमूद गुन्ह्यातील आरोपीत हे मीरा रोड व कासारवडवली परिसरातील भागात रहात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने श्री.खैरनार यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर ठिकाणी पोलीस पथक जावून त्यांनी सापळा रचून आरोपीत नामे १)रहीम मुस्तफा सय्यद, वय-२० वर्षे, धंदा- बेकार राहणार- मीरा रोडर)चिन्मय संदीप सावंत, वय-२०वर्षे,धंदा-बेकार राहणार-कासारवडवली यांना दिनांक १६/७/२०२० रोजी अटक करून आरोपीतानी चोरी केलेल्या रोख रक्कमे पैकी २२००/-रुपये हस्तगत करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
नमूद कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश कुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त, परि-५ अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त, वर्तक नगर विभाग पंकज शिरसाट यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार,पो.नि(गुन्हे) अविनाश काळदाते, स.पो.नि सागर जाधव, पो.उप.नि मोरे, पो.हवा/पाटील ५४०६ पो.हवा/कोरे ५४०८,आर.एस चौधरी/३४३२,चंद्रकांत गायकवाड/२५७९,पो.ना/१७८आर.एस.महापुरे,पो.ना.तायडे/१२६३, पो.ना /६६५२ आर.आर.रावते यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास पो.ह.कोरे ५४०८ हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here