जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जळगांव शहर युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ विरोधात रिलायंस पेट्रोल पंप जळगांव येथे प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मुक्तदीर बाबा देशमुख यांचा नेतृत्वत विश्वासघात आंदोलन करण्यात आले. व लॉलीपॉप देणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला.
BJP प्रणित मोदी सरकार सामान्य जनतेचा तोंडाला पाने पुसण्याची कामे करीत आहे पेट्रोलने शभरी गाठली आहे गॅसचे दर दररोज वाढत आहेत देशाची जनता या दरवाढीत होरपळून निघाले आहे असे होत असताना बी जे पी सरकार काहीच उपाय योजना करताना दिसत नाही असे मुक्तादिर देशमुख म्हणाले.

सबके साथ… विश्वास घात व बी जे पी सरकारच निषेध करून विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या आंदोलन करताना जळगांव शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजीब पटेल, जाकिर बागवान सरचिटणीस अनिशा जावेद पिंजारी, गुड्डू शेख ,पापा पाशा मोहसीन कच्ची, राजेश कोलते नरेंद्र पाटील ,शयाम अहिरे, रेणू शर्मा व पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते






