आटपाडी (प्रतिनिधी) – जागतिक किर्ती आणि उंचीचे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांचे हस्ते करणेत आले . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, राष्ट्रवादी ओबीती सेलचे आटपाडी तालुका अध्यक्ष जालींदर कटरे, राष्ट्रवादी च्या सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत , सामाजीक कार्यकर्ते संतोष मोटे, रोहीत सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे नियोजन यमगर ,कटरे ,शिंदे यांनी केले .






