शिवजयंतीनिमित्त शनिपेठ पो.स्टे.चे पी.आय. विठ्ठल ससे यांनी केले पाणपोईचे उद्घाटन

स्मशानभूमीच्या सफाई सह श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठानचा संयुक्त स्तुत्य उपक्रम

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – शिवजयंतीनिमित्त श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज कोंबडी बाजार येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शनिपेठ पोलिस स्टेशनचे पी .आय .विठ्ठल ससे यांच्या हस्ते करण्यात आले.

shivtej-pratishthan

छत्रपती शिवरायांचा प्रेरणा मंत्र आकाश फळे यांनी सादर केला . ‘ जय शिवाजी, जय भवानी ‘ या घोषणांनी शिवभक्तांनी परिसर निनादून सोडला.ससे साहेबांचा सत्कार जितेंद्र दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आला .शिवजयंती प्रित्यर्थ २४ तास जलसेवा उपक्रमाचा (पाणपोईचे) शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमास संदिप दाभाडे, राकेश लोहार, ललित खडके, किरण सोनवणे, दिनेश मिस्तरी, मुकेश कोळी, हेमंत चौधरी, हर्षल झाल्टे, राकेश तिवारी, किशोर भोसले, डॉ हितेंद्र गायकवाड , विश्व हिंदू परिषद महानगर उपाध्यक्ष हरिष कोल्हे त्यानंतर रामेश्वर कॉलनी येथील स्मशानभूमीची सामुहिक साफसफाई करण्यात आली .त्याप्रसंगी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे,जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, राहुल परकले,सुरज दायमा,निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निर्मूलन समिती जिल्हा सहसचिव विजय लुल्हे,किरण कोलते, सामाजिक कार्यकर्त्या यामिनी लोहार, सुजाता सिद्धपुरे यांनी सहभाग घेतला .उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करून उपक्रम उत्साहाने राबविण्यात आला . स्मशान भुमीतील महानगर पालिकेचे सुरक्षा रक्षक कृष्णा शिरसाळे यांचा हृद्य सत्कार मराठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राहुल परकाळे यांच्या हस्ते करण्यात आले . तसेच साफसफाईसाठी झाडूही शिरसाळेंना सुपूर्द करुन समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here