शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून खास व्हिडीओ पोस्ट

राहुल गांधीं आणि शरद पवार यांचंही शिवरायांना अभिवादन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त नमन केलं आहे. नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवरायांवरील भाषणाचा एक आपला जुना व्हिडीओ शेअर केला आहे. दुसरे ‘शिवाजी’ कोणी होऊ शकत नाही पण ‘सेवाजी’ मात्र होऊ शकतो असं सांगत सेवेचं महत्व अधोरेखित केलंय. पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटलंय की, भारत मातेचे सुपुत्र छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त नमन. त्यांचे साहस, अद्भुत शौर्य आणि असाधारण बुद्धीमत्ता अनेक युगे देशवासियांना प्रेरित करतील

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शौर्य, साहस आणि पराक्रमाचे प्रतिक असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा असे राहुल गांधींनी आपल्या संदेशात म्हटलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यातील आणि देशातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय की, “जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!”

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही देशवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय की, “छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मी त्यांचे स्मरण करतो. ते एक योद्धा, प्रतापी सेनानायक, कुशल प्रशासक आणि लोककल्याणकारी शासक होते. शिवाजी महाराजांनी नेहमी जनहित, राजहित आणि राष्ट्रहितालसाठी काम केलंय. त्यांचे जीवन सर्व भारतीयांसाठी गौरव आणि प्रेरणेचा स्रोत आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here