धक्कादायक सलग दुसऱ्या दिवशी अलिबाग तालुक्यात कोरोनाच्या 57 नवीन रुग्णांची चिंताजनक वाढ

  • बाधित रुग्णांची एकूण संख्या पोहोचली 538 वर
  • एकुण मृतांची संख्या झाली १४
  • ३११ रुग्णांची कोरोनावर मात

अलिबाग-सोगावकर – आज(17 जुलै)अलिबाग तालुक्यात सलग दुसर्‍या दिवशी पन्नासचा आकडा पार केला आहे, रुग्णांची संख्या दोन अंकांनी वाढत चालली आहे,आज 57 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, अलिबाग शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात मृतांची संख्या 14 झाली असून, एकूण बाधित रुग्णांचा आकडा 538 वर गेला आहे. यापैकी 311 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये आरसीएफ कॉलनी कुरुळ येथील 8, आंबेळी-नागांव येथील 3, खंडाळे येथील 1, राहुलपाडा-पेझारी येथील 1, गंगासागर सोसायटी-अलिबाग येथील 3, बंदरपाडा कोळीवाडा-अलिबाग येथील 1, शहाबाज येथील 3, शिवकृपा स्वामी समर्थ नगर-पिंपळभाट येथील 1, चिंचवली येथील 6, अलिबाग शहरातील समृद्धी सोसायटी-घरत आळी येथील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे,
तसेच बामणगांव-बोरपाडा येथील 1, गोंधळपाडा येथील 1 यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे,
अलिबाग शहरातील बालाजी नाका येथील 1, रेवस गांव येथील 2, खारपेढांबे येथील 1, विद्यानगर येथील 2, चोरगुंडी येथील 1, ढोलपाडा खंडाळे येथील 2, सी वूड विद्यानगर येथील 1, नवेदर-नवगांव येथील 1, पेझारी येथील 1, दांडेपाडा-वरसोली कोळीवाडा येथील 4, थळ आगार येथील 3, थळ डोंगरी येथील 1, कस्टम बंदर कोळीवाडा-अलिबाग येथील 1, अलिबाग-रामनाथ तांबोळी हॉस्पिटलजवळील गंगाई येथे 1, बोडणी 1, सर्वेश्‍वर मंदीरजवळ-नवीन देहन-अलिबाग येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे,
आज दहा रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये बहिरोळे येथील 1, सहाणगोठी येथील 3, फुफादेवीपाडा-रेवस येथील 3, सिद्धार्थ नगर-अलिबाग येथील 1, बहिरोळे-मापगाव येथील 1, देहन-शहापूर येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. तसेच अलिबाग शहरातील अ‍ॅकॉन क्लासिक येथील 50 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आजअखेर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 538 वर पोहोचली आहे. यापैकी 213 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 311 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. आजसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात वाढणारे कोरोनाचे रुग्ण व लॉकडाऊन याबाबत काही जबाबदार व्यक्तींना त्यांच्या प्रतिक्रिया विचारली,असता त्यांनी सांगितले,ते पुढील प्रमाणे…

ज्याप्रमाणात कोरोनाचे पेशंट वाढत आहेत, त्याचा अर्थ असा आहे की लोक कोणतेही नियम काटेकोरपणे पाळत नाहीत,आणि त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तर लोकानी शक्यतो घराबाहेर पडू नये, पडलेच तरसॅनिटायझर, मास्क,लावून बाहेर पडावे,गेले तीन महिने आपण लॉकडाऊन मध्येच आहोत, पण याचा फायदा काहीच दिसत नाही, सरकारने लॉक डाऊन असा करावा की, कोणीही माणूस बाहेर दिसता कामा नये, त्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवावा, आणि तसेच या लॉक डाऊन मुळे ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अश्या लोकांना सरकारने जीवनावश्यक वस्तू पुरवावे,
दिपाली संजय पाटील, पोलीस पाटील, धोकवडे-मांडवा

कोरोना आजाराचे प्रमाण आता लहान मुलांमध्ये वाढतय, पालकांनी विशेष काळजी घ्यावयाची आहे,लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये,खात्री केल्याखेरीज बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात जाऊ नये,तसेच गाव पातळीवर पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी यांनी दिलेल्या सूचनेचा पालन करायचं आहे, प्रशासनाला मदत करून कोरोना विरोधात लढायचं आहे,धन्यवाद.
सौ प्रीती प्रसाद गायकवाड, पोलीस पाटील – चोंढी- बामणसुरे

कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे, व अलिबाग तालुक्यात 500 च्या वर वाढले आहे, दररोज 2 अंकांनी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे, म्हणून नागरिकांनी स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी,गावात,शहरात बाहेर पडले तर, सॅनिटायझर, मास्क जरूर वापरावा,म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने आपल्या भागात काटेकोर पणे जर लाॅकडाऊनचे नियम केले पाहिजेत,पण जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे.
वसीम इकबाल कूर, उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत मापंगाव,अलिबाग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here