सौ.अलकाताई कापुरे यांची बहुजन परिवर्तन प्र.महाराष्ट्र महिला बचाव समितीच्या धुळे महिला जिल्हाध्यक्षपदी निवड

पुणे (बाजीराव नाईक) – बहुजन परीवर्तन प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, धुळे महिला जिल्हाअध्यक्ष म्हणून शिंदखेडा येथील सौ.अलका अरविंद कापुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अलकाताई कापुरे हे सामाजिक कार्यकर्ता असून, त्यांनी अनेक समाज सेवेचे उपक्रम राबवले आहेत. सद्यस्थितीत दोन संस्था चालवत असून, अनेक महिलांच्या न्याय हक्कासाठी त्या अहोरात्र कार्यरत आहेत. समाज सेवेचा वसा आणि कोरोना संकट असताना अलकाताई यांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा केली. कोरोना संकटकाळी लोकांना मदतीचा हात पुढे करून त्यांना आरोग्य योजनेची माहिती देत होते .अशा सातत्याने समाजकार्यात कार्यरत असणाऱ्या सौ.अलकाताई कापुरे यांच्या समाजसेवेची दखल घेत, त्यांची धुळे महिला जिल्हा अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांनी बिनविरोध निवड केली आहे.
सौ.अलकाताईंच्या या निवडीबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख सौ.तेजस्वी गणेश कवळे यांनी आभिनंदन केल असुन. नियुक्तीचे पत्र बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या हस्ते लवकरच देण्यात येणार आहे अलकाताईंच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here