जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येने सात हजारांचा टप्पा ओलांडला

जळगाव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.१७) प्राप्त झाल्यानंतर नव्याने ३०५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाने तीन शतकी आकडा पार केल्याने, जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ७२७५ झाली आहे. आज सर्वाधिक ५२ रुग्ण जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात जिल्ह्यातील १३ कोरोनाबाधितांच्या मृत्यू झाला आहे.
आज आढळून आलेल्या ३०५ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर ५२, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ २८, अमळनेर ४, चोपडा २०, पाचोरा २६, भडगाव २५, धरणगाव ७, यावल ३, एरंडोल ४, जामनेर ४८, रावेर २०, पारोळा २२, चाळीसगाव १६, मुक्ताईनगर ९, बोदवड ९ व अन्य जिल्ह्यातील एक असा समावेश आहे.
आज दिवसभरात १३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात भुसावळातील ४ तर जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, यावल तालुक्यातील प्रत्येकी दोन व जामनेर, एरंडोल व जळगाव शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here