गृहरक्षक दलातील १०० जवानांचा कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मान

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र पोलीस बॉइज असोसिएशन तथा होमगार्ड संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ डी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील हॉटेल प्लॅनेट ये

थे गृहरक्षक दलातील १०० जवानांना कोरोना योद्धा गौरव २०२० सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले. होमगार्ड जवान हे कोरोना महामारीमध्ये सर्व मुंबईतील लोकांचे संरक्षण करत आहे असे असूनसुद्धा शासनाकडून कोणत्याही सुखसुविधा मिळत नाही ३ महिन्यांपासून त्यांना संजय पांडे IPS महासमादेशक होमगार्ड (CG) कार्यालयातून वेतनसुद्धा देण्यात आलेले नाही असे असूनसुद्धा कोरोना योद्धा आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत अशा कोरोना योध्याचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्या कर्तव्याची पोचपावती म्हणून कोरोना योद्धा गौरव सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन धीरज पार्सेकर

निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, अमोल माने प्रदेश अध्यक्ष मुंबई , अमोल पटेकर सरचिटणीस मुंबई, प्रकाश शेरे पीआरओ घाटकोपर यांच्या मार्फत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here