शिवजयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रयतेच्या राजाला खास मानवंदना

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त संपूर्ण राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. शिवजयंतीनिमित्त लोकं एकमेकांना शुभेच्छा देत आहेत पण सगळ्याचं लक्ष वेधून घेतलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच त्यांच्या वेगळ्या अंदाजासाठी आणि ठाकरे शैलीसाठी ओळखले जातात. त्याचबरोबर ते एक उत्तम कलाकार देखील आहेत. आता शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा सांगणारा एक व्हिडीओ स्वतःच्या आवाजात बनवून खास शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘ह्या हिंदभूमीवरील स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा म्हणजे शिवछत्रपती… कालही, आजही आणि उद्याही!’ असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांना खास अभिवादन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन सुभाषचंद्र बोस आपल्या सहकाऱ्यांना कसं पटवून देतात हे सांगताना दिसून येतंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here