धनाजी नाना महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

फैजपूर (यावल तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंखे) – येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण व उत्सव समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ उदय जगताप यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा डी बी तायड़े, राष्ट्रीय सण व उत्सव समितीचे चेअरमन प्रा डॉ आय पी ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ नितीन चौधरी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा शेरसिंग पाडवी, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेन्द्र राजपूत, डॉ सतीश चौधरी , डॉ ए के पाटील , डॉ एस व्ही जाधव, डॉ पी डी पाटील, डॉ एन एल चव्हाण, डॉ सिंधु भंगाळे, प्रा सुजाता भंगाळे , प्रा नाहिदा कुरेशी, डॉ जी एस मारतळे, डॉ डी एल सूर्यवंशी, डॉ रवि केसुर, डॉ योगेश तायड़े, प्रा शिवाजी मगर, श्री आर एस सावकारे, श्री नितिन सपकाळे, श्री व्ही एस सिसोदे, श्री सिद्धार्थ तायड़े श्री गणेश चव्हाण, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर केंद्र शासन, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वेळोवेळी निर्गमित केलेले नियम व आवश्यक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करीत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here