मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात बेरोजगारी वाढलेली असताना आता खोट्या कागदपत्राच्या आधारे नोकऱ्या मिळवण्याचे काम सुरु आहे. अशीचं एक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. मुंबई महानगर पालिकेत नोकरी मिळवण्यासाठी एका महिलेने खोट्या कागदपत्रांचा आधार घेतला. आणि पालिकेच्या घनकचरा विभागात नोकरी मिळवली. या प्रकरणाची तक्रार पोलीसांना दिल्यानंतर एमआरए मार्ग पोलीसांनी महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पालिकेचे सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक अतुल प्रभाकर जातेगावकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची चौकशी केली असता, ही घटना समोर आली.
पालिकेच्या ई-वॉर्ड येथे घनकचरा व्यवस्थापन विभागात निर्मला शामजी कातरिया या नावाने बनावट कागदपत्र सादर करुन नोकरी मिळवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पी.टी. कमिटीअंतर्गत केलेल्या चौकशीत हा सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेविरोधात एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आणि आता पोलिस पुढील तपास करत आहेत.






