सौदी अरेबियात हिमवृष्टी

रियाध –वाळवंटासाठी प्रसिद्ध असलेल्या सौदी अरेबियात काही दिवसांपूर्वी जोरदार हिमवृष्टी झाली. सौदीतील या हिमवृष्टीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. जवळपास ५० वर्षानंतर अशाप्रकारची हिमवृष्टी झाली असल्याचे म्हटले जाते. या हिमवृष्टीमुळे सौदी अरेबियाच्या काही भागातील तापमान शून्य अंश सेल्सिअसवर पोहचले होते.

याआधीदेखील सौदी अरेबियात अशा प्रकारची हिमवृष्टी झाली होती. मात्र, त्याचे प्रमाण अतिशय कमी होते. सौदीत झालेली बर्फवृष्टी ही तुरळक प्रमाणात होते. एक आठवड्यांपूर्वी आखाती देशांमध्ये थंडी सुरू झाली आहे. रात्री वाहणाऱ्या थंड हवेमुळे काही भागातील तापमान शून्य अंशाखाली गेल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सौदीतील नागरिकांना सकाळी उष्ण आणि रात्री थंड हवामानाला सामोरे जावे लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here